Thursday, November 16, 2023

माझी कुरवपुर यात्रा

 

१५,एप्रिल,२०१८  




श्री क्षेत्र माहूर, गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर, कोल्हापूर, माणगाव(तालुका कुडाळ ), गरुडेश्वर, अक्कलकोट, झिरी(बडनेरा), वासुदेवनिवास-पुणे, इ . दत्तस्थानांना पुष्कळ वेळा जाणे झाले. कारंजा तर माझे मातुलच परंतु ४० वर्षात विशेषेकरून गेली ५ वर्षेहैदराबाद ला असूनही कुरवपुर आणि पिठापूर या दत्तस्थानाना काही ना काही कारणामुळे जाता आले नाही हि खंत मनाला होतीम्हणून २ वर्षापूर्वी कुरवपुरला  जाण्याचा बेत आखला. एक महिनाआधीच श्री अरुणराव दावलेकर जाऊन आल्याचे माहित होते म्हणूनत्यांचेकडून पूर्ण माहिती घेतली. हि यात्रा कशी घडली/विशेष असे ते काय हे लिहिण्यापूर्वी दत्तस्थानांची विशेष आवड निर्माणहोण्या्मागची पूर्वपीठीका वाचणारयाची क्षमा मागून आणि आत्मस्तुतीचा दोष पत्करून विदित करतो.

आम्ही मुळचे वाशिमचे.  नागपूरला फ्रेंड्स सोसायटी लेआउट नं.,रविन्द्रनगर मध्ये १९७८/७९ साली घर बांधलेमाझे आजोबा रामचंद्रचिकाटे मुळचे शांडिल्यचिकाटेकडे दत्तक आलेलेतेव्हाचे लोकल बोर्डाचे सेक्रेटरीअतिशय कर्मठ आणि .वासुदेवानंद सरस्वतीमहाराजांचा अनुग्रह लाभलेलेवाशिमचे करुणेश्वर मंदिरात ते तासनतास समाधी लाऊन बसंत असे वडील सांगत. आयुष्यातील माझे १९६०/६१ चेदरम्यान फक्त एकदीड वर्षाचे  वाशिमचे वास्तव्यात काही अतिवृध्द व्यक्तीकडून त्यांचा उल्लेख “देवमाणूस “ असा ऐकला होतास्वामिमहाराजाकडून “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” किंवा “साधना सुरु ठेवावी” अशा  मजकुराची त्यांना आलेली / पत्रेमाझे काकांचे संग्रही होती असे ऐकलेले आठवते .माझे वडील नानासाहेब उर्फ भगवंत चिकाटे केवळ सातवी पर्यंत शिक्षण झाल्यामुळेवयाचे २५ नंतर तेव्हाचे जनपद सभा/लोकल बोर्डाचे शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून लागले होतेअतिशय किमान वेतन आणि २०००/२५००  लोकसंख्या असलेले खेड्यात नोकरीपगार खूप कमी आणि नेहमीच /,/ महिने उशिरा मिळत म्हणून थोडे वैदिकी शिकूनघेतले आणि कुणाकडे गरजेनुसार सत्यनारायण,जप जाप्य करीत शिवाय  गुरुचरित्र/रामविजयहरिविजय वाचीत.  उशिरा मिळणाऱ्याअल्प पगाराला तेवढीच जोड . किन्हीराजा या खेडेवजा गावात  वीचे पुढे शिक्षणाची सोय नसल्यामुळे  मी जुलै,१९५५ मध्येमातुलगृही कारंजास जाऊन मुलजीजेठा हायस्कूलात ७वे वर्गात प्रवेश घेतला.  मार्च/एप्रिल१९५९ मध्ये झालेले एस एस सी परीक्षेत६०० पैकी ४१९  गुण आणि गणित,फिजिक्सकेमिस्ट्री आणि सोशल सायन्स या  विषयात प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालोआर्थिकपरीस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे पुढे काय करावे प्रश्न होताजुलै,१९५९ मध्ये  नक्की आठवत नाही नांदेड कि औरंगाबाद येथेप्रकांड पंडित श्री यद्नेश्वरशास्री कस्तुरे  / होतकरू ब्राह्मण विद्यार्थ्यास घरी ठेऊन घेऊन थोडे धार्मिक शिक्षण देतात आणिदिवसभरात आवडीचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासहि परवानगी देतात असे समजल्यावरून त्यांना भेटलो पण महाविद्यालयाचेप्रवेश पूर्ण होऊन गेले होतेनिराश होऊन परतलोवडिलांनी गुरुचरित्राचे पारायण कर म्हणून सांगितले दिवस उपवास करूनपारायण केलेचमत्कारावर विश्वास नाही पण देवावर अतूट श्रद्धा आहे/ ऑगस्टला मामांची  ताबडतोब ये” म्हणून तार आलीविदर्भ महाविद्यालयअमरावती येथे प्री-युनिवर्सिटी सायन्सला एक जागा रिकामी होती आणि सिकची धर्मार्थ वसतिगृह (जवाहर गेटचेआतयेथेही एक जागा रिकामी होतीतेव्हा  कॉलेजची फी रु.१५ होतीमामांचीही आर्थिक स्थिती यथातथाच होती माझे मामावेदमूर्ती कैप्रभाकरशास्री तांबोळकर यांनी  २०/२५  रु दरमहा देण्याची जबाबदारी घेतली आणि वीमवी मध्ये प्रवेश घेतलापरंतुपुढलेच  वर्षी वडिलांना अर्धांगवायुचा  अटॅक  आल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेवडील तेव्हा रिसोड येथे होते. १९६०/६१ दिड वर्ष वाशिम येथे काही खाजगी स्वरूपाची कामे करून  डिसेंबर,१९६१ मध्ये रिसोड येथील भारत माध्यमिक शाळेत क्लार्क-शिक्षकाची नोकरीपत्करलीतेव्हापासून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात गुरुचरित्राचे पारायण सन २०११ पर्यंत करीत होतो२०१२ पासून मात्र बंद केले आणिरोज एक अध्याय वाचतो

आता मुख्य विषय. श्री अरुणराव दावलेकरानी कुरवपुर मंदिरात जाण्यासाठी नदीचे काठावरून होड्यांची सोय आहे थोड्या पायरयाचढउतार कराव्या लागतात म्हणून सांगितले होते म्हणून बेत आखला. मी आणि सौ.आमचे ड्रायव्हरला घेऊन कारने गेलो. मतकल/आतकुर येथे कृष्णा नदीचे काठावर १२ वाजताचे दरम्यान पोहोचलो तर काही सर्व्हेकरिता एक आठवडा आधीपासून  कृष्णा नदीचेपाणी अडविल्यामुळे नदी कोरडी पडून मोठमोठ्या शिळा ( अजस्र दगड) उघड्या पडल्या होत्या हे पाहिले. नदीचे पात्रात मध्ये बरीचझाडे असल्यामुळे अंतर कमी आहे असे वाटले आणि बरेच भाविक पैलतीरी  पात्रातून पायी जात आहेत असेहि  दिसले. सौ.लाहि तीव्रअस्थमा असल्यामुळे जास्त चालवत नाही. नदीचे पात्रातून तर तिला चालवणारच  नाही हे लक्षात आले.  नदी पात्राचे काठावरझाडाखाली कार पार्क करून तिला तिथेच थांबावयास सांगितले आणि श्री मधुसूदन गौड, ड्रायव्हर ला घेऊन मी बेटावर जाण्यासाठी निघालो. 

दगड खूप तापले होते, चप्पलं  घालून चालता येत नव्हते गेली ३५ वर्षे डायबिटीस (दिवसातून ४ वेळा इन्सुलीन),बीपी, ४वर्षापूर्वी बायपास आणि ४ महिन्यापूर्वी अन्जिओप्लस्ति होऊन २ स्टेन्त टाकलेले. चप्पल हातात घेऊन मोठमोठे दगड पार करीत जातहोतो  त्यातच दिसत असलेले झाडा पलीकडे पात्र आणखी मोठे आहे हे लक्षात आले कसेतरी पूर्ण पात्र ओलांडून मंदिरापर्यंतपोहोचलो. सोवळे नेसून गाभारयात जाऊन पादुकांचे दर्शन घेतले. थोडासा प्रसाद घेतला सौ.साठी थोडा सोबत घेतला आणि परतनिघालो. आता मात्र बिलकुल चालवत  नव्हते श्वास लागला होता. बोलवत नव्हते मधू ड्रायव्हरने  मात्र मला सावरून घेतले. धरूनधरून चालत आणि गुरु महाराजांचे नाव घेत घेत अंतर पार करण्यास लागणाऱ्या २५  मिनिटा ऐवजी दीड तास वेळ घेऊन कसाबसाकाठावर पोहोचलो. काठावर जवळजवळ एक तास कल्पना करवत नाही एवढा त्रास झाला. हैदराबादला फोन करून जावई/मुलीलाबोलवून घ्यावे असाही एक विचार मनात आला. पण ते घाबरतील  आणि त्यांना यायला आणखी २/३ तास लागतील  म्हणून तो  मनातून बाजूला केला. माझी अवस्था पाहून सौ. घाबरून गेली होती. सोबत आणलेले फराळाचे थोडे खाल्ले  जवळचे छोटे दुकानातूनथोडे थंड पेय घेतले आणि विश्रांती घेऊन परत निघालो. हैदराबादला ७ वाजता पोहोचलो. त्यानंतरही २/३  दिवस खूप थकवा जाणवतहोता आणि पाय कमालीचे दुखत होते.

कृष्णा नदीचे कोरड्या पात्रातील दगड धोंड्यातून जाण्याचे साहस केले आणि  खूप त्रास झाला पण .......   खूप दिवसांनी श्रीपादश्रीवल्लभ महाराजांचे पादुकांचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद त्रासापेक्षा कितीतरी जास्त  झाला. पिठापूरला जाणे त्यामानाने अगदीच सोपे  आहे.  पिठापूरला जाण्याचा योग केव्हा  येतो याची आता आतुरतेने वाट पाहतो आहे.

 





    


              

Wednesday, June 15, 2011

test facebook like

Monday, May 21, 2007

spruha

majhi mulgi